दीपाली आहेर यांना राज्यस्तरीय ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार’ प्रदान

322

प्रतिनिधी: आदिवासी विकास विभागाचे राज्याचे अपर आयुक्त (मुख्यालय) विकास पानसरे यांच्या शुभहस्ते दीपाली आहेर यांना राज्यस्तरीय ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
पेठ तालुक्यातील इनामबारी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या शिक्षिका दीपाली पुंजाराम आहेर यांनी ‘आश्रमशाळांमधील किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन व उद्बोधन’ या विषयावर प्रस्ताव सादर केला होता. त्यांच्या या उपक्रमाचा नाशिक प्रकल्पातील हजारो विद्यार्थिनींना फायदा झालेला आहे. त्यांच्या या उपक्रमाची राज्यस्तरावर निवड होऊन त्यांना कर्तृत्ववान महिला पुरस्कार देण्यात आला.
नाशिक येथील आदिवासी विकास भवनातील अपर आयुक्तांच्या दालनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सहायक आयुक्त संदीप चव्हाण, उपायुक्त प्रदीप पोळ, उपायुक्त अविनाश चव्हाण, सहायक आयुक्त हेमलता गव्हाणे, सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) वर्षा सानप, सहायक प्रकल्प अधिकारी (नियोजन) अनीता दाभाडे आणि शिक्षक ध्येयचे संपादक मधुकर घायदार उपस्थित होते.

दीपाली आहेर यांना नुकताच ‘ज्ञानसंवाद’ या शैक्षणिक व्यासपीठावर हिरकणी सेवा सन्मान पुरस्कार मिळाला आहे.

नाशिक: आदिवासी विकास भवनात ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार’ विकास पानसरे यांचेकडून स्विकारतांना दीपाली आहेर सोबत पती सुनील पवार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here