हेमंत चोपडे शहापूर:- ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात कोरोना रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हयातील सर्व महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र आणि अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगर परिषद कार्यक्षेत्र वगळून जिल्हयातील उर्वरित संपूर्ण ग्रामीण क्षेत्रातील तसेच शहापुर व मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील इयत्ता ५ वी ते १२ चे वर्गासाठी केवळ आदिवासी विकास विभागाची सर्व वसतिगृहे व निवासी आश्रमशाळा, तसेच समाजकल्याण विभागाचे अधिपत्याखालील सर्व वसतिगृहे व निवासी शाळा दि.२२/०३/२०२१ पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवणेत याव्यात. परंतु इयत्ता १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात राहणे ऐच्छिक असेल.यासाठी पालकांचे संमतीपत्र आवश्यक असेल.मात्र विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाईन शिक्षण पूर्ववत चालू राहतील असे आदेश ठाणे जिल्ह्याधिकारी यांनी दिले आहेत.
या आदेशास अनुसरून प्रकल्प अधिकारी,एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प कार्यालय शहापूर यांनी प्रकल्पातील सर्व आश्रमशाळा व वसतिगृह 22/03/2021 पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.