– स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन अर्थात सर फाऊंडेशन व महाराष्ट्र वुमन टीचर्स फोरम च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील आठ कर्तृत्ववान शिक्षिकांचा जिल्हास्तरीय ‘नारीशक्ति सन्मान पुरस्कार’देऊन गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा महिला समन्वयक मंजुषा स्वामी व जिल्हा समन्वयक समाधान शिकेतोड ,गुणवंत चव्हाण व शिवाजी चव्हाण यांनी दिली. पुरस्काराचे वितरण लवकरच होणार आहे.
शिक्षिका म्हणून कार्य करत असताना शाळा स्तरावर विविध नावीन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून अध्यापन, सामाजिक कार्यातील सहभाग व कोविड काळातील योगदान याचा विचार करुन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यावर्षीच्या पुरस्कार विजेत्या
💃🏻1] माने रोहिणी बबन ( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामसवाडी ता.कळंब )
💃🏻2] आवारे सुनंदा साधु ( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडकी ता. वाशी )
💃🏻3] जाधव मनोरमा मुरलीधर
( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोमगाव नं.1ता.परंडा)
💃🏻4] मुसळे सोनाली दत्ताञय ( जिल्हा परिषद प्रशाला ता. उमरगा]
💃🏻5] शेख शबाना कादिर ( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेगाव ता. उस्मानाबाद )
💃🏻6] इंगळे वंदना कोंडिबा [ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टा ता.भूम ]
💃🏻7] डोंगरे वर्षा गोवर्धन ( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी ता. उस्मानाबाद )
💃🏻8] अंजली रमेश निकते[ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळा खुर्द ता.तुळजापूर ]यांची निवड झाली आहे.
या निवडीबद्दल सर फाऊंडेशनचे महिला राज्य समन्वयक सौ. हेमा शिंदे(वाघ), राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे व बाळासाहेब वाघ राजकिरण चव्हाण श्री.राज किरण चव्हाण व श्रीमती.अनघा जागीरदार यांनी अभिनंदन केले आहे.