जागतिक जल दिन 22 मार्च रोजी घ्यावयाची जल शपथ

444

जल शपथ

जागतिक जल दिन- दि.२२ मार्च,२०२१

मी, पाणी बचतीची व पाण्याचा विवेकी वापर करण्याची प्रतिज्ञा करत आहे.

मी, पाण्याचा सुयोग्य वापर करण्याची प्रतिज्ञा देखील करीत आहे. तसेच मी, पाण्याचा थेंब अन थेंब साठवेन आणि “कॅच द रेन” या अभियानाच्या यशस्वितेसाठी संपूर्ण सहयोग देईन.

मी, पाण्याला एक अनमोल संपदा मानेन आणि असे समजूनच पाण्याचा वापर करेन.

मी अशीही प्रतिज्ञा करत आहे की, मी माझे कुटुंबीय, मित्र आणि शेजाऱ्यांना पाण्याचा विवेकी वापर करण्याबाबत व पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत प्रेरित करेन. तसेच त्यासाठी सर्व आवश्यक प्रयत्न करेन.

ही वसुंधरा आपली आहे. आपणच या वसुंधरेला वाचवू शकतो आणि आपले भविष्य सुरक्षित करू शकतो.

यासाठी मी देशाचा जलरक्षक म्हणून कायम कार्यरत राहण्याची शपथ घेत आहे.

 

जल शपथ सौजन्य-
राज्य पाणी व स्वच्छता मिशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here