शिष्यवृत्ती परीक्षा ५ वी, ८ वी आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ

335

परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक २५ एप्रिल, २०२१ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०९ मार्च ते २१ मार्च, २०२१ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ३० मार्च, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. ३० मार्च,२०२१ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.

अधिक माहितीसाठी परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट दया:-

 

https://www.mscepuppss.in/

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here