बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.
दरवर्षी प्रमाणे सन २०२१-२२ या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असून सर्व जिल्हयातील आरटीई अंतर्गत २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चालु आहे. सन २०२१-२२ या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता सर्व जिल्हयातील आरटीई अंतर्गत
पात्र असलेल्या ९४३२ शाळांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे . सन २०२१-२२ या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांना अर्ज करण्याकरीता दिनांक ०३/०३/२०२१ ते दिनांक २१/०३/२०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु दिनांक ११/०३/२०२१ ते दिनांक १५/०३/२०१६ या कालावधीमध्ये OTP ची तांत्रिक अडचण आल्यामुळे पालकांना अर्ज भरता आले नाही. तरी, OTP ची तांत्रिक अडचण दूर झाली असून पालकांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढवून देणेबाबत तक्रारी संचालनालयास प्राप्त होत आहेत तसेच काही जिल्हयांमध्ये कोरोणाचा प्रार्दुभाव लक्षात घेता लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे त्यामुळे
सन २०२१-२२ या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांना अर्ज करण्याकरीता दिनांक ०३/०३/२०२१ ते दिनांक ३०/०३/२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे,