3% महागाई भत्ता लागू करणार; राज्य शासकीय कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक

354

शशिकांत इंगळे,अकोला

वार्ताहर: राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा मागील तीन महिन्यांपासून थांबलेला वाढीव 3% महागाई भत्ता देण्याबाबत राज्य सरकारने सकारात्मकता दाखवली आहे.
कोरोनाच्या महामारी च्या काळात कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता लांबणीवर जाणार असे प्रत्येक कर्मचाऱ्यांना वाटत होते. परंतु राज्य सरकारने जानेवारी महिन्याच्या वेतन देयकसोबत राज्य कर्मचाऱ्यांचा 3% महागाई भत्ता दिला जाणार आहे. या विषयावर वित्त विभागासोबत चर्चा झाली आहे.
हा वाढीव 3% महागाई भत्ता केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे 1 जुलै 2021 पासून लागू केला जाणार आहे. तसेच 1 जुलै 2021 पासून डिसेंबर 2021 पर्यंत 3% महागाई भत्ता यामधील फरक सुद्धा सोबतच दिला जाणार आहे. हा वाढीव महागाई भत्ता सेवानिवृत्त झालेल्या पेन्शन धारक आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारक कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू असणार आहे.
राज्य शासकीय कर्मचारी यांच्या मध्ये महागाई भत्ता मिळणे बाबत मोठा असंतोष वाढत असल्याने राज्य सरकारने याबाबत निर्णय अधिक योग्य ठरेल. जर राज्य कर्मचाऱ्यांकडून याबाबत आंदोलन केल्यास कोरोना महामारी चा संसर्ग जास्त मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्या बाबत विरोध केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here