वारे गुरूजींचे काय चूकले ?

337

–✒️नितीन कोंडिबा महानवर
शास आश्रम शाळा थेटेगव्हान ता धारूर जि बीड


मागे आपण एक अंतरराष्ट्रीय ख्यातीची जिल्हा परीषदेची शाळा फेसबुक व्हॉट्सॲपवर व्हायरल झालेली नक्कीच पाहिलेली असणार ; त्याला कॅप्शन होते “ मी एखाद्या आंतरराष्ट्रीय हॉटेल जवळ उभा नाही आणि मग आपल्याला त्या वाबळेवाडी शाळेची ती काचेची आकर्षक चित्र दिसते त्यात शाळेची पंचतारांकित हॉटेलला लाजवेल अशी ईमारत आणि समोर प्रशस्त हिरवळ “ होय मी त्यांच वाबळेवाडीच्या जि.प. शाळा आणि त्या शाळेस विद्यार्थी संख्ये अभावी बंद पडणारी शाळा ते आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त अनेक पुरस्कारांनी नावाजलेली जि.प. शाळा वाबळेवाडी या प्रवासात अत्यंत महत्वाची भूमिका वटवणारे दत्ता वारे सर तथा मुख्याध्यापक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक . पन आज तोच शिक्षक ज्याने ही आंतरराष्ट्रीय शाळा उभारली तोच शिक्षक आज निलंबित होतो …..?
होय होय चक्क निलंबित होतो हे वाक्य आपल्याला खरे वाटणार नाही परंतु हे दुर्दैवाने अगदी सत्य आहे . वाबळेवाडीची आंतरराष्ट्रीय शाळा उभारणारे शिक्षक श्री दत्ता वारे सर यांना पुणे जिल्हा परीषदेने निलंबित केले आहे. महाराष्ट्रच नव्हे तर संपुर्ण भारतात मैलाचा दगड ठरलेली शिक्षण क्षेत्रात इतिहास घडवलेली शाळा , जिची पटसंख्या ३४ होती ९ वर्षानंतर पटसंख्या ५३१ वर पोहोचली . फक्त संख्यात्मकच नाही तर गुणात्मक बदल घडवून आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात प्रेरक ठरली आहे. लोकसहभाग आणि पालक यांनी स्वनीधीतून कोट्यावधी रुपयाच्या जमिनी दान दिल्या “खर्चू नका देवासाठी पैसा।
शिक्षणाला पैसा तोच द्या हो॥”
गाडगेबाबा यांच्या उक्तीनुसार गावातील
धार्मिक यात्रा समारंभ बंद करून लोकजागर करून ही शाळा उभारली . शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात ते नक्कीच विद्यार्थी हिताचे व विद्यार्थ्यांला अध्ययन प्रेरक असे असतात . या सोबतच शाळेत अभ्यासक्रमा व्यतिरिक्त ८ विविध भाषां शिकवल्या जातात . इयत्ता १० वी १२ वी नंतर विविध स्पर्धा परीक्षांची तयारी इथे इयत्ता ६ वी पासूनच करवून घेतली जाते हे उल्लेखनीय आहे .


या व्यतिरिक्त सह शालेय उपक्रम जसे विद्यार्थ्यांच्या कलानुसार भविष्यातले व्यवसायाच्या संधी ? कोडींग-डीकोडींग , प्रोग्रामिंग असे कित्येक उपक्रम या शाळेत राबवले जातात. आणि त्याचा फायदा हजारो विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात घेतला आहे .
लाखो शिक्षक प्रेमी शिक्षक , शिक्षणतज्ञ , अधिकारी यांनी याशाळेस प्रत्यक्ष भेट देऊन शाळेचे कौतुक केले आहे , येवढेच नाही याशाळेत जे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रम राबवले जातात ते आपल्या शाळेत यशस्वीपणे राबवले जातात.
या शाळेस एक साधी जिल्हा परीषदेची शाळा ते आंतरराष्ट्रीय ख्यातीची शाळा करणारे श्री वारे सर यांना त्यांच्या कार्यांचे दखल घेत राष्ट्रपती पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे .
पण स्थानिक राजकारण आणि हेवेदावे यातून
अशा शिक्षकावर अत्यंत हास्यास्पद आरोप करून नुकतेच निलंबित करण्यात आल्याचे समजते . अहोरात्र शाळेसाठी धडपडणार्या एका प्रामाणिक शिक्षकास कामात अनियमितता असा आरोप ठेवून निलंबित केले. गावकऱ्यांनी लाखो रुपये जमा केले कंपन्यांकडून निधी मिळवला, त्याचा हिशोब गावकऱ्यांनी ठेवला. मुख्याध्यापकांचा काहीच संबंध नसताना पन बळेच ओढून-ताणून त्यांना या आर्थिक व्यवहारात जबाबदार धरून निलंबित केले आहे .

देशात विद्येचे माहेरघर म्हणवणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेने या उपक्रमशील शिक्षकाला निलंबित करून तमाम प्रयोगशील शिक्षकांचा अपमानतर केला आहेच पन यापुढे अशा प्रकारे काम करण्यास कोणी धजावेल का असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य शिक्षकास पडल्याशिवाय राहत नाही ?
एकीकडे आपला मिडिया काही लोकं सरकारी शाळा त्यांची गुणवत्ता याबद्दल टीका करतात परंतु याच शाळा ही व्यवस्था बदलू पाहणार्या एका प्रामाणिक शिक्षकास अशा कारवाईला सामोरे जावे लागणे ही मोठी शोकांतिका आहे!!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here