दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

313

शशिकांत इंगळे,अकोला

वार्ताहर: शालेय शिक्षण विभागाकडून नुकतेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोरोना परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याची लिखाणाची सवय कमी झाल्याचे शक्यता आहे. त्यामुळे परीक्षेच्या वेळेत सवलत देण्याचे परीक्षा मंडळाने ठरवले आहे. ही सवलत 80 गुणांचा पेपर करिता विद्यार्थ्यांना तीस मिनिटे तर 60 गुणांच्या पेपर करिता पंधरा मिनिटांचे सवलत देण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यास मदत होणार आहे. दहावी बारावीचे वेळापत्रक राज्य मंडळाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ग्रामीण भाग वगळून शहरी भागातील दहावी आणि बारावीचे वर्ग दिवाळीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने सुरू होते. त्यामुळे या वर्षीही मागील वर्षी प्रमाणे मूल्यांकन पद्धतीने निकाल लावण्याचे मागणी पालकांकडून सातत्याने होत होती. मात्र कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्याचे राज्य मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची परीक्षा 4 मार्च तर इयत्ता दहावीची परीक्षा 15 मार्च पासून घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच परीक्षेचे वेळापत्रक परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. लिखाणाचा सराव नसल्याने विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना हात दुखणे, अवघडणे, बोटे दुखणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन परीक्षा मंडळाने जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दहावी व बारावीच्या पेपर विद्यार्थ्यांना वेळेची सवलत देण्याचे ठरविण्यात आले आहे. दहावीच्या 80 गुणांचा पेपर असल्यास त्या विषयाकरीता साडेतीन तास तर गणित, विज्ञान, समाजशास्त्र या विषयांसाठी सव्वादोन तास देण्यात आले आहेत. म्हणजेच प्रथम, द्वितीय आणि तृतीय भाषेकरिता तीस मिनिटे आणि गणित विज्ञान समाजशास्त्र या विषयात करिता पंधरा मिनिटे जास्तीचे देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना भाषेकरिता 30 मिनिटाची तसेच व्यवसायिक अभ्यासक्रमाचे विषय आणि अन्य विषयांत करिता पंधरा मिनिटांचे अतिरिक्त वेळ देण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा लिहिताना हात दुखणे सारख्या समस्या निर्माण झाल्यास त्यांना अतिरिक्त वेळ याचा उपयोग होणार आहे. कोरोना महामारी मुळे सलग 20 महिने शाळा पूर्णता बंद होत्या. त्यामुळे मुलांना लिहिण्याचा सराव कमी झाला आहे. या कारणाने परीक्षेत विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागणार होते. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना पेपर निहाय अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे. असा निर्णय मागील वर्षी सुद्धा घवण्यात आला होता मात्र मागील वर्षी परीक्षा झाल्या नसल्याने त्यांची अंमलबजावणी झाली नाही. त्यावेळी तशीच परिस्थिती असल्याने विद्यार्थ्यांना वेळेच्या सवलतीचा फायदा देण्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले आहे.

🗳️दिनांक २५ जानेवारी रोजी राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणे

वाचा👉

📌आयोजित करावयाच्या विविध स्पर्धा

📌मतदारांसाठी प्रतिज्ञा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here