नवीन नियमानुसार होणार शिक्षक भरती : शिक्षण विभागाचा निर्णय

437

अफरोजखान जमीर खान पठाण वार्ताहार:- सरकारी शाळेमध्ये शिक्षकांचे पद मोठया प्रमाणावर रिक्त असून जवळपास 52630 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत अनेक वर्षापासून वरील जागा रिक्त असून आजवर शासनाने अतिथी शिक्षकांना नेमून कार्यभार दिला आहे.
नुकतीच राज्यभर TET परीक्षा घेण्यात आली असून आता नवीन नियमावली तयार करून शासन शिक्षकांच्या जागा भरणार आहे.
1) पात्र उमेदवार TET उत्तीर्ण असावा
2) TET नंतर त्या उमेदवारांनी CET परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल
3) CET मध्ये घेतलेल्या गुणवत्तेनुसार भरतीसाठी यादी जाहीर केली जाणार
4) सहावी ते आठवी शिक्षकांची नेमणूक करताना स्पर्धा परीक्षेचे नियोजन आहे, या शिक्षकांना प्राधान्य असेल….
वरील नियमावली तयार केली तरी अगोदर प्राथमिक शाळेतील कार्यरत शिक्षकांना बढती द्यावी लागेल अशी मागणी अनेक वर्षापासून प्राथमिक शिक्षकांची आहे,याचा विचार करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 67% शिक्षकांची नवीन भरती होणार तर 33% शिक्षकांना बढती देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here