शशिकांत इंगळे,अकोला
वार्ताहर : ग्रामीण भागातील विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असतात या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा याकरिता शासनाने अभ्यास गटाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
या अभ्यास गटामार्फत कोल्हापूर, जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारणा करिता हा अभ्यासगट असणार आहे.
औरंगाबादचे जिल्हाधिकारी मा. सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा अभ्यास गट तयार केला जाणार असून यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. जयसिंग चव्हाण तसेच कागलचे गटशिक्षण अधिकारी मा.गणपती कमळकर यांचा सुद्धा समावेश असणार आहे.
या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांकरिता वापरण्यात येणारे नवनवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांकरिता व शिक्षकांकरीता असणाऱ्या सुविधा तसेच विद्यार्थ्यांचे शिस्त, आचार-विचार आणि शिक्षकांच्या शिकवण्याच्या कार्य पद्धती या सर्व बाबींची सखोल अभ्यास करण्याकरिता विशेष तज्ञ मंडळींचा अभ्यास गट तयार करण्यात आला आहे. ही समिती दिल्ली येथील सरकारी शाळांमध्ये जाऊन त्याचा अहवाल शासनास सादर करणार आहे.