शशिकांत इंगळे,अकोला
वार्ताहर: शुक्रवारी सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर झाला होता. या पेपर मध्ये देण्यात आलेल्या एका परिच्छेदामुळे विद्यार्थी पालक तसेच राजकीय लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. विद्यार्थी शुक्रवारी परीक्षेला बसल्यानंतर पेपर मध्ये देण्यात आलेल्या परिच्छेद पाहून चक्क धक्काच बसला. या प्रकरणावर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी आणि कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. राहुल गांधी यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यानंतर अखेर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत विचारण्यात आलेला वादग्रस्त परिच्छेद बोर्डाने मागे घेतला आहे.
तसेच त्या परिच्छेदाचे विद्यार्थ्यांना संपूर्ण गुण देण्यात येणार असल्याची माहिती सीबीएसई बोर्डाने जाहीर केली आहे. याबाबत सीबीसीई बोर्डाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
❓काय होता तो परिच्छेद.
‘बायकांच्या मक्तेदारीमुळे पालकांचा मुलांवरील अधिकार नष्ट झाला. पुरुषाला त्याच्या मुळ स्थानावरून खाली आणण्यासाठी पत्नी आणि आईने स्वत:वरील बंधने पायदळी तुडवली. पती आधी “स्वतःच्या घराचा मालक” होता. परंतु, पत्नीने त्याला आपल्या आज्ञेखाली आणले. त्याबरोबरच मुलांना आणि नोकरांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून घेण्यास शिकवले गेले’ अशे वर्णन या परिच्छेदात करण्यात आले होते अनेक विद्यार्थ्यांना या परिच्छेदमध्ये स्त्रियांचा अपमान वाटला. या उताऱ्याखाली दिलेल्या बहुपर्यायी प्रश्नामध्ये लेखकाची वैशिष्ट्य विचारन्यात आली होती. त्या प्रश्नाचे उत्तर देताना अनेक विद्यार्थ्यांनी ‘पुरुष अराजकतावादी डुक्कर’ असे उत्तर लिहिले. खरे पाहता या प्रश्नाचे योग्य उत्तर ‘जीवनाकडे हलक्या मनाच्या दृष्टिकोनातून पाहतो’ असे आहे. आणि इतर पर्यायांमध्ये लेखक ‘एक असंतुष्ट पती’ किंवा ‘त्याच्या कुटुंबीयांचे मनापासून कल्याण साधणारा’ असा पर यांचा समावेश करण्यात आला होता.