शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया मार्चपासून राबवणार, मे पासून होणारे बदली.

380

शशिकांत इंगळे, अकोला

वार्ताहर: जिल्हाअंतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया मार्चपासून राबवली जाणार आहे आणि मे महिन्यापासून ऑनलाइन पद्धतीने बदल्या होणार आहे. अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिक्षक सहकार संघटनेच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी दिली.
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या व जिल्हा अंतर्गत बदल्या लवकरात लवकर करण्यात याव्यात असे निवेदन शिक्षक सहकार संघटनेच्यावतीने ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आली होती. त्यावेळी ग्रामविकास मंत्र्यांनी शिक्षकांच्या बदल्या सॉफ्टवेअर टेंडर चे काम अजून पूर्ण झाले नसल्याची माहिती त्यांनी दिली. काम लवकरात लवकर पूर्ण होईल व मार्चपासून बदल्यांची प्रक्रिया पूर्णतः सुरू करून मे महिन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने शिक्षक बदल्या होतील अशी ग्वाही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here