आता MahaStudent App द्वारे शिक्षक व विद्यार्थी हजेरी

544

राज्यातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent अॅपद्वारे नोंदविण्याबाबत.

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डीजीटल शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आली आहे. भारत सरकारने PGI (Performance Grading Index) हा निर्देशांक विकसित केला आहे. यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजीटल पध्दतीने उपस्थिती यासाठी गुण आहेत यासाठी राज्याने विकसित केलेल्या सरल प्रणाली मध्ये शाळांच्या विद्यार्थी व शिक्षक यांच्या माहितीच्या आधारे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्यासाठी सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजीटल पध्दतीने MahaStudent अॅपद्वारे भरून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here