यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी विविध शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेशासाठी मुदतवाढ

252

ऑनलाईन प्रवेश मुदतवाढ सूचनापत्र

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी विविध शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेशासाठी दिनांक 01 जुलै 2021 ते 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत विना विलंब शुल्क मुदत देण्यात आली होती. तथापी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर कार्यरत असलेली अभ्यासकेंद्रे आणि विद्यार्थ्यांची मागणी व गरज लक्षात घेऊन (बी.एड्. व कृषी शिक्षणक्रम वगळून) नियमित शुल्कासह ऑनलाईन प्रवेशअर्ज भरण्याची मुदत दिनांक 25 ऑक्टोबर 2021 पर्यंत वाढविण्यात येत आहे. दिनांक 26 ऑक्टोबर 2021 पासून रु.100/- विलंब शुल्कासह ऑनलाईन प्रवेश उपलब्ध असतील.

सत्र पध्दतीचे शिक्षणक्रम तसेच तीन / सहा महिने मुदतीचे प्रमाणपत्र / पदविका शिक्षणक्रमांच्या परीक्षा डिसेंबर 2021 मध्ये प्रस्तावित आहेत. त्यामुळे विलंबशुल्कासह ऑनलाईन प्रवेशाच्या मुदतीबाबत दिनांक 26 ऑक्टोबर 2021 रोजी सूचनापत्र प्रसिध्द करण्यात येईल.

ऑनलाईन प्रवेश अर्ज विहीत मुदतीत सादर करुन निवडलेल्या अभ्यासकेंद्रावर संपर्क साधून प्रवेशास मान्यता ( Study Center Approval) दिनांक 05 नोव्हेंबर पर्यंत घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here