उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय कनिष्ठ महाविद्यालये/संस्था मध्ये घडयाळी तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या कनिष्ठ अधिव्याख्याता यांना प्रदान करावयाच्या मानधनाचे दर सुधारित करण्याबाबत..
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अख्यत्यारितील उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय कनिष्ठ महाविद्यालयात एखाद्या विषयासाठी अर्धवेळ शिक्षकासाठी आवश्यक असलेला कार्यभार उपलब्ध होऊ शकत नसल्यास अशा विषयाच्या अध्यापनासाठी घडयाळी तासिका तत्वावर अधिव्याख्यात्यांची नेमणूक करण्यात येते. संदर्भाधिन शासन निर्णयान्वये उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय कनिष्ठ महाविद्यालयातील घडयाळी तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या अधिव्याख्यात्यांना लागू करण्यात आलेल्या मानधनाच्या दरात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.