उपक्रमशील शिक्षकांच्या मनातील बात,त्याला डायरेक्टरच्या कॉफीची साथ अर्थात “Coffee with Director

243

विषय: ” उपक्रमशील शिक्षकांच्या मनातील बात,त्याला डायरेक्टरच्या कॉफीची साथ अर्थात “Coffee with Director” या कार्यक्रमाबाबत …..

  मार्च २०२० पासून कोविडच्या

प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद होत्या.टप्याटप्याने शाळा सुरू होत आहेत. अशा परिस्थितीत मुलांचे शिकणे सुरु रहावे, या हेतूने शिक्षण विभागातर्फे विद्यार्थी आणि शिक्षक समृद्धीकरणासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
*राष्ट्रीय व राज्य स्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या अनुभवाचा,ते राबवत असलेल्या उपक्रमांचा लाभ राज्यभरातील शिक्षकांना होण्यासाठी राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी संवाद साधण्याकरिता प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने ” *उपक्रमशील शिक्षकांच्या मनातील बात,त्याला डायरेक्टरच्या कॉफीची साथ* अर्थात “Coffee with Director” हा कार्यक्रम शिक्षकांसाठी आयोजित केला आहे.
हा कार्यक्रम दि.२२/१०/२०२१ रोजी दुपारी ठीक ०२.०० वाजता युट्युब लाईव्ह द्वारे संपन्न होणार आहे. पुढील यु ट्यूब लिंकद्वारे आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल.

याबाबत वरिष्ठ अधिव्याख्याता, गशिअ,अधिव्याख्याता, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख,विषय सहायक यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे.तसेच whats app समूहाद्वारे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व शिक्षकांपर्यंत ही माहिती पोहचवावी.जास्तीत जास्त शिक्षक या उपक्रमात सहभागी होतील याबाबत योग्य कार्यवाही करावी.

श्री.दिनकर टेमकर
संचालक
प्राथमिक शिक्षण संचालनालय,
महाराष्ट्र राज्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here