(MahaTET)महाराष्ट्र टीईटी अ‍ॅडमिट कार्ड आज पासून उपलब्ध, जाणून घ्या डाऊनलोड करण्याची प्रक्रिया

399

.
● महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणीसाठीचं प्रवेशपत्र (अ‍ॅडमिट कार्ड) आज (14 ऑक्टोबर रोजी) अधिकृत वेबसाइटवर जारी केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारे प्रवेशपत्र दिले जाईल.


● जे परीक्षार्थी अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रवेशपत्राची वाट पाहत होते, त्यांना आज प्रवेशपत्र मिळेल. mahatet.in ला भेट देऊन, रोल नंबर आणि इतर तपशीलांच्या मदतीने लॉगिन करून परीक्षार्थी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करु शकतात.
● 31 ऑक्टोबर 2021 रोजी योग्य COVID-19 प्रोटोकॉलसह परीक्षा आयोजित केली गेली आहे. TET पेपर I आणि पेपर II अशी घेतली जाणार आहे. पेपर 1 ची परीक्षा त्या उमेदवारांसाठी घेतली जाते जे इयत्ता पहिली ते पाचवी शिकवण्यास इच्छुक असतात तर पेपर II त्या उमेदवारांसाठी घेतली जाते ज्यांना सहावी ते आठवीचे वर्ग शिकवायचे आहेत.
● प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

महाराष्ट्र टीईटी प्रवेशपत्र 2021: डाऊनलोड करण्याच्या स्टेप्स
1: अधिकृत वेबसाइट mahatet.in ला भेट द्या.
2: आता मेन पेजवर दिसणाऱ्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
3: लॉगिन पेजवर, आपला अर्ज क्रमांक आणि संकेत शब्दासह लॉगिन करा.
4: प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करा.
5: तुमच्या प्रवेशपत्राची प्रिंट काढा.

● प्रवेशपत्रात उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, परीक्षा केंद्राचा तपशील, रोल नंबर आणि इतर तपशील असतील. उमेदवारांना अ‍ॅडमिट कार्डमध्ये दिलेली सर्व माहिती तपासण्याचा सल्ला दिला गेलाय. प्रवेशपत्रात काही विसंगती किंवा चुकीचं आढळल्यास, तुम्ही mahatet2021.msce@gmail.com वर तक्रार पाठवू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here