NCERT मार्फत विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी ऑनलाईन Diploma कोर्स

247

NCERT Diploma course for upper primary Science Teacher

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचेमार्फत उच्च प्राथमिक शाळेमधील (सहावी ते आठवी) विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छुक शिक्षकांनी आपली माहिती SCERT च्या लिंकवर https://forms.gle/bh3FjJDgTiG4x2CR7

दि. १७/१०/२०२१ पर्यंतच भरावी.
SCERT, महाराष्ट्र पुणे यांनी दिलेल्या लिंकवर नोंदणी केल्यानंतर NCERT च्या https://ncertx.in/courses/coursev1:All_published+All_published_101x+2021/about लिंकवर सुद्धा नोंदणी करणे व ऑनलाईन पेमेंट करणे आवश्यक आहे. ऑनलाईन प्रशिक्षणसंदर्भात सर्व माहिती वरील लिंकवर उपलब्ध आहे.

NCERT च्या लिंकवर नोंदणी व online payment दि. १७/१०/२०२१ पर्यंतच करता येणार आहे. सोबत online payment कसे करावे याबाबत पत्रक जोडले आहे. इंग्रजी भाषेमधूनच सदर कोर्स उपलब्ध असल्याने या भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या शिक्षकांना या कोर्ससाठी नोंदणी करणेबाबत सूचित करण्यात यावे. या कोर्ससाठी प्रत्येक राज्यातून २००० शिक्षक नोंदणी करू शकतात. दिलेल्या लिंकवर नोंदणी केलेल्या पहिल्या २००० शिक्षकांची नावे आपल्या राज्यामार्फत या कोर्ससाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांना सादर करण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी.
धन्यवाद

विज्ञान विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र, पुणे.

प्रशिक्षण संदर्भात अधिक सविस्तर माहिती साठी खालील चित्रावर क्लिक करा 👇

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here