कोरोना काळात विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य विकसित व्हावे यासाठी जिल्हा परिषद शिक्षक विजयकुमार वसंतपुरे व शिवनाथ भुजबळ यांनी तयार केलेल्या ‘अक्षरधारा-शिक्षणाचे पहिले वळण’या पुस्तकाचे प्रकाशन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी यांच्या हस्ते संपन्न झाले.
कोरोना प्रभावामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत.यामुळे शिक्षण क्षेत्राचे खूप मोठे नुकसान झालेले आहे.पहिली व दुसरीला असलेले विद्यार्थी व शिक्षक यांची अजुन गाठभेट झालेली नाही.विद्यार्थ्याचे शिक्षण चालू असावे यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न झालेला आहे.विद्यार्थ्यास शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे करण्यात आला आहे. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्याना मूळाक्षरांचा सराव चांगल्या प्रकारे देता यावा ,अक्षरांचे वळण विद्यार्थ्याना समजावे व देवनागरी संपूर्ण सुधारीत वर्णमाला विद्यार्थ्यानी आत्मसात करावी यासाठी या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे.कोविड काळात शिक्षक आपले कौशल्य वापरून उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करीत असून पारावरची शाळा,स्वच्छ-सुंदर शाळा यांच्या माध्यमातून सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्मिती होत असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी व्यक्त केले.
पुस्तकाचे प्रकाशक अभिषेक प्रकाशन,सोलापूर हे असून
प्रकाशन समारंभास सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ , हेमा शिंदे,जिल्हा समन्वयक राजकिरण चव्हाण,अनघा जहागिरदार व उस्मानाबाद जिल्ह्याचे समन्वयक गुणवंत चव्हाण उपस्थित होते.