इ.१२ वी गुणपत्रके वितरण

243

(विषय-सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) सन २०२१ च्या निकालाचे गुणपत्रक व अभिलेख वितरणाबाबत

उपरोक्त विषयाबाबत आपणांस कळविण्यात येते की, राज्यात कोविड १९ विषाणूच्या प्रार्दुभावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी ) सन २०२१ चा निकाल जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार सदर निकालाचे गुणपत्रक व तपशीलवार गुण दर्शविणारे अभिलेख उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना वितरणाबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

१. प्रत्येक वितरण केंद्राला जोडलेल्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या लक्षात घेऊन जादा वितरण केंद्रे निर्माण करणे किंवा त्याच वितरण केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवून वितरण खिडकी संख्या वाढविण्यात येऊन उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना गुणपत्रिका हस्तांतरीत करण्यात याव्यात.

२. सदर गुणपत्रिका विभागीय मंडळाकडून उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना वितरीत करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी असेल. विभागीय मंडळानी सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार तयार केलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) सन २०२१ च्या निकालाची गुणपत्रक उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना दिनांक २०/८/२०२१ व २१/८/२०२१ रोजी वितरीत करावीत.

३. दिनांक २१/८/२०२१ दु.३.०० वा. पासून संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना त्यांचे गरजेनुसार व सोईनुसार शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व नियमांचे व सूचनांचे पालन करुन गुणपत्रक वितरण करावे. याबाबत सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना परिपत्रकान्वये कळविण्यात यावे. विद्यार्थ्यांना विशिष्ट तारखेला गुणपत्रक घेऊन जाणेबाबत आग्रह धरु नये. तसेच उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पालक/विद्यार्थी यांची एकाच वेळी गर्दी होणार नाही याची दक्षताघेऊन नियोजन करावे.

४. गुणपत्रिका वितरणासाठी वितरण केंद्रावर स्थायी लिपीक व शिपाई पाठविण्याबाबत कार्यवाही करावी.

सचिव,राज्यमंडळ पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here