पुणे;-
७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ब्रीज सोशल फाउंडेशन आयोजित, पुणे विभागातील पर्वती पायथा येथील १०१ लहान मुलांना खाऊचे किट वाटप करण्यात आले. या किट मध्ये गुड डे बिस्कीट, कॅडबरी, टोस्ट पॅकेट, राजगिरा लाडू, याप्रमाणे खाऊचे साहित्य समाविष्ट होते. वस्तीमधील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. चिमुकल्या बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद स्वातंत्र्य दिनाची शोभा द्विगुणित करीत होता. ‘स्वातंत्र्य दिन चिरायू होवो’ अशा देशभक्तीमय घोषणांनी आसमंत दणाणून निघाला. कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती पर्वती मतदार संघाचे शिवसेना अध्यक्ष मा. श्री. सुरज लोखंडे हे होते. संस्थेचे अध्यक्ष मयूर शिंदे, संस्थेचे पदाधिकारी अनिता कदम, मंगेश थेरडे, वर्षा गावडे, दक्षता, दाऊद शेख, सारंग सोनवणे, सचिन कांबळे, सुशील राऊत, गणेश साठे, उमेश करपे, नेहा गावडे, अजिंक्य पोटे, अक्षय साठे, जतीन रावा, निखिल गायकवाड, श्याम मोरे, रोहित मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.