एकलव्य निवासी शाळा प्रवेश प्रक्रिया सुरू

423

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यान्वित इंग्रजी माध्यमांच्या सर्व एकलव्य मॉडेल रेसीडेंशियल स्कुल मधील इयत्ता ६ वी च्या वर्गात नियमीत प्रवेश तसेच इयत्ता ७ ते ९ वी च्या वर्गातील विदयार्थ्यांच्या रिक्त जागा भरणेकरीता अनुसूचित / आदिम जमातीच्या विदयार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी https://admission.emrsmaharashtra.com ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेशोच्छूक विद्यार्थ्यांचे पालक / शिक्षक / मुख्याध्यापक यांनी सदरील लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेले आवेदनपत्र ऑनलाईन भरून त्यासोबत मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करावयाचे आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता अर्जदार विद्यार्थ्याचा सरल पोर्टलवरील Student Id माहीत असणे आवश्यक आहे.

आवेदनपत्र ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत राहणार आहे.

ऑनलाईन अर्ज भरतांना विचारात घ्यावयाच्या बाबी :

१. ऑनलाईन अर्ज भरतांना विद्यार्थ्याचे रजिट्रेशन करण्याकरिता अर्जदार विद्यार्थ्यांचा सरल पोर्टल मधील स्टूडंट आय डी (१९ अंकी) माहित असणे आवश्यक आहे.

२. अर्ज भरतांना विद्यार्थ्याचा सरल आय डी आणि मोबाईल नंबर टाकून अर्जदार विद्यार्थ्याचा पासवर्ड तयार करून घ्यावा. सदरील पासवर्ड आपण नमूद केलेल्या मोबाईलवर तात्काळ SMS व्दारे कळविण्यात येईल.

३. प्रत्यक्ष अर्ज भरतांना विद्यार्थ्यांस कोणत्या इयत्तेत प्रवेश घ्यावयाचा आहे ते अचूक नोंदवावे.

४. पालकांचा राहण्याचा पत्ता विचारात घेवून विद्यार्थ्यास गुणानुक्रमे नजीकच्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश देण्यात येईल यांची कृपया नोंद घेण्यात यावी.

५. अर्जदार विद्यार्थी आदिम जमातीमधील असल्यास तशी नोंद अर्जामध्ये करण्यात यावी.

६. अर्जदार विद्यार्थी दिव्यांग असल्यास तशी नोंद अर्जामध्ये करण्यात यावी.

७. विद्यार्थ्यास ज्या इयत्तेत प्रवेश घ्यावयाचा आहे त्याच्या मागील वर्षाच्या इयत्तेचे ९०० पैकी प्राप्त गुण अर्जामध्ये भरण्यात यावे. तसेच संबंधित इयत्तेचे गुणपत्रक अर्जामध्ये अपलोड करण्यात यावे.

८. अर्ज भरल्यानंतर एखादी माहिती दुरुस्त करावयाची असेल तर विद्यार्थ्याचा सरल क्रमांक व पासवर्ड टाकून पून्हा लॉगीन करावे तद्नंतर माहिती दुरुस्त करून झाल्यावर अर्ज पून्हा अपडेट करावा.

९. परिपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंट काढण्यासाठी लॉगिन केल्यानंतर प्रिंट ऑप्शन मध्ये जावून अर्जाची प्रिंट घेता येईल.

सविस्तर माहितीसाठी खालील पत्राचे अवलोकन करावे :-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here