प्रति,
1.उपसंचालक, प्रादेशिक विद्या
प्राधिकरण, मुंबई.
२.प्राचार्य,जिल्हा शिक्षण व
प्रशिक्षण संस्था, सर्व.
3.शिक्षणाधिकारी, प्राथमिक व
माध्यमिक, सर्व
4.शिक्षणाधिकारी /प्रशासन
अधिकारी मनपा सर्व.
विषय: माध्यमिक व उच्च
माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आयोजित यंग वारियर कॅम्पेन बाबत….
उपरोक्त विषयानुसार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र व YuWaah – युनिसेफ यांच्या सहकार्याने covid-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी यंग वारियर कॅम्पेन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 8 वी ते 12 वीच्या वर्गात अध्ययन करणार्या विद्यार्थ्यांनी कौटुंबिक बांधिलकी जोपासण्याचा हेतूने covid-19 या आजाराबाबत आपल्या कुटुंबामधील सदस्यांमध्ये जागृती करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कुटुंबामध्ये covid-19 या आजाराबाबत जागृती करून योग्य काळजी घेतल्यास या आजारापासून कुटुंबाला सुरक्षित ठेवणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राज्यातील अनेक कुटुंबांमध्ये जागृती करता येईल, या उद्देशाने SCERT, YuWaah- युनिसेफ यांच्या वतीने इयत्ता 8 वी ते 12 वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार दि. 2 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत ऑनलाईन पद्धतीने उद्बोधन सत्र आयोजित केलेले आहे. या उद्बोधन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी खालील U tube link चा वापर करावा.
तसेच इयत्ता 8 वी ते
12 वीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी दि. 3 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत ऑनलाईन पद्धतीने उद्बोधन सत्र आयोजित केलेले आहे. या सत्रासाठी खालील U tube link द्वारे सहभागी होता येईल.
या उपक्रमांमध्ये इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग असलेल्या राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग नोंदवावा. या उपक्रमाची माहिती आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांपर्यंत पोहोचवावी.
–
दिनकर टेमकर
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे.