इ.१ली ते इ.५ वी व इ. ६ वी ते इ. ८ वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित/ विना अनुदानित, कायम विना अनुदानित, इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक ०३/०८/२०२१ पासून सुरु होत असून दि. २५/०८/२०२१ अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील.
महत्वपूर्ण तारखा:-
ऑनलाईन अर्ज – 03/08/2021 ते 25/08/2021
प्रवेशपत्र प्रिंट- 25/09/2021 ते 10/10/2021
परीक्षा दिनांक- 10/10/2021