आता शिक्षण घेऊ न शकणाऱ्यांसाठी ” व्यावसायिक अभ्यासक्रम” कौशल्य विकास मंडळातर्फे ३०१ अभ्यासक्रम उपलब्ध

394

प्रभाकर कोळसे:हिंगणघाट (वर्धा)
कौशल्य विकास मंडळाचे वतीने नियमीत विद्यार्थ्यांसह अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी तद्वतच विशिष्ट शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कमी कालावधीचे व्यवसाय अभ्यासक्रम चालविण्यात येतात. सध्या मंडळांतर्गत ३०१अभ्यासक्रम राबविण्यात येतात. हे अभ्यासक्रम जिल्हा, तालुकास्तरावर तसेच ग्रामीणभागात मंडळाने मान्यता दिलेल्या १ हजार २६९ संस्थांमध्ये राबविण्यात येत आहेत .
विशेषत: खेड्यापाड्यातील, गोरगरीब विद्यार्थी मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेऊन प्रशिक्षण पूर्ण करतात. मंडळाचे अभ्यासक्रम हे रोजगार व स्वयंरोजगारास चालना देण्याच्या दृष्टीने विशेष करुन शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आहेत. या सर्व अभ्यासक्रमांची माहिती आता नव्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळवावे.असे आवाहन राज्याचे कौशल्य विकास , रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी नुकतेच केले आहे.
नियमीत विद्यार्थ्यांसह शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान असलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाच्या विविध ३०१ अंशकालीन व पूर्णवेळ अभ्यासक्रमांची माहिती आता नवीन संकेतस्थळावर मिळणार आहे. www.msbsd.edu.in या नव्या संकेतस्थळाचे तसेच मंडळाच्या बोधचिन्हाचे अनावरण नुकतेच राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here