आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र बोधचिन्ह (LOGO) स्पर्धा

514

‘आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र ” स्थापनेस राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रचा अॅक्ट दि. १९ जानेवारी, २०२१ च्या अधिसूचनेनुसार दि. २१ जानेवारी, २०२१ पासून अंमलात आलेला आहे.

राज्यात प्रथमच ” आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र ” स्थापन होत असल्याने, या विद्यापीठासाठी Logo (बोधचिन्ह) असणे आवश्यक आहे. बोधचिन्ह अंतिम करण्यासाठी स्पर्धात्मक प्रकारे राज्यातील अथवा देशातील विविध व्यावसायिक अथवा हौशी बोधचिन्ह आराखडा तयार करणारे याच्यांकडून बोधचिन्हासाठी संकल्पना मागवून घेण्यात येत असून, त्यास शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र बोधचिन्ह (LOGO) स्पर्धा

राज्याची क्रीडा विषयक कामगिरी जास्तीत जास्त उंचावणेकरिता क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली प्रशिक्षणाची क्षेत्रे विचारात घेऊन, नोकरीच्या जास्तीत संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास व्यावसाईक दृष्टीने प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार मार्गदर्शक निर्माण होऊन, खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे हा राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ निर्मितीचा उद्देश आहे.

याच उद्देशाने शासनाने राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र स्थापन केलेले आहे, या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह (LOGO) ठरविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असून, या स्पर्धेच्या नियम, अटी व पुरस्कार विषयक माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या स्पर्धेत भारतातील नागरिक भाग घेऊ शकतात, तसेच या स्पर्धेसाठी आपले बोधचिन्ह तयार करुन सादर करण्याचा अंतिम दिनांक १० ऑगस्ट, २०२१ असा राहील.

या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमाकांच्या विजेत्यांना रु.५०,०००/- रु.३०,०००/- व रु.२०,०००/- पारितोषिक प्रदान करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here