पाठ्यपुस्तकांचा करा पुनर्वापर- महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद

196


हिंगणघाट ( प्रभाकर कोळसे)

समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०१०-२० व २०२०-२१ मध्ये मोफत वाटप केलेली पाठ्यपुस्तके सुस्थितीत असलेली पाठ्यपुस्तके शाळां मध्ये जमा करण्यात यावी यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके सुस्थितीत ठेवण्याची सवय लागावी असे नमुद केले आहे.त्या अनुषंगाने असे कळविण्यात येते की सदर पाठ्यपुस्तके जमा करण्यासाठी वाटस अप, फेसबुक, ई-मेल प्रसार माध्यमांचा वापर करण्यात यावा तसेच पालकांना व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून जमा करण्याबाबत आवाहन करण्यात असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी यांनी सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक, प्रशासन अधिकारी/ शिक्षणाधिकारी महानगर पालिका यांना नुकतेच कळविले आहे.
पालकांना प्रत्यक्ष भेटून पाठ्यपुस्तके जमा करण्याबाबत आवाहन करण्यात यावे पालक व विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगावे जे पालक व विद्यार्थी स्वेच्छेने पाठ्य पुस्तके जमा करण्यास इच्छुक असतील त्यांच्याकडुन ते जमा करण्यात यावी याबाबत कोणतीही पालकांवर अथवा विद्यार्थ्यांवर पुस्तके जमा करण्यास सक्ती करु नये ही पाठ्यपुस्तके सत्र २०२०-२१ चे अखेरीस जमा करण्यात यावीत असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here