शाळेला राज्यात नावलौकिक मिळवुन देणाऱ्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापकांचा अखेर तडकाफडकी राजीनामा!
शाळांच्या कामात बाहेरच्यांचा वाढता हस्तक्षेप?
प्रभाकर कोळसे:हिंगणघाट ( वर्धा )
नावीन्यपूर्ण उपक्रमांनी देशभर नावाजलेले व देश-विदेशातील शाळांशी सामंजस्य करार करून अभिनव शिक्षण पद्धती लागू केलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते जिल्हा परिषद शिक्षक दत्तात्रेय वारे यांना कोंडीत पकडून शाळा बदनाम करण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. याबाबत ग्रामस्थांनीही प्रशासनाकडे तशा तक्रारी केल्या होत्या. शाळेत ग्रामस्थांकडून सुरू केलेल्या इतर शैक्षणिक उपक्रमांमध्ये वारे व इतर शिक्षकांना ओढून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी जाणीवपूर्वक झाला. हा प्रकार असह्य झाल्याने वारे यांनी आज राजीनामा दिला.त्यांचे समवेत सहकारी एकनाथ खैरे, केंदुर ता शिरूर चे मुख्याध्यापक जयसिंग नर्हे यांनी ही राजीनामा दिला आहे.