शशिकांत इंगळे, अकोला
वार्ताहर: ग्रामीण भागातील ८ वी ते १२ वी चे वर्ग १५ जुलैपासून कोरोना नियमाचे पालन करून सुरू करण्यात येणार आहेत तसेच आता या नंतर शहरी भागातील सुद्धा शाळा सुरू करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री, वर्षा गायकवाड यांनी औरंगाबाद मध्ये दिली लॉकडाऊन असल्याकारणाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे. त्या कारणाने बालविवाह, मुलींच्या गळतीचे प्रमाण वाढणे तसेच बालमजुरी सोबतच शैक्षणिक नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी कोरोना मुक्त गाव असलेल्या ग्रामीण भागातील ८ वी ते १२ वी प्रमाणे शहरातील सुद्धा शाळा सुरू करण्याची कार्यवाही शासनाकडून सुरू झाली आहे. याबाबत जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन. लवकरच शहरी भागातील शाळा सुरू करण्यात येतील असे शालेय शिक्षण मंत्री, वर्षा गायकवाड यांनी सांगितले. शहरी भागातील शाळा सुरू करणे बाबत राज्यातील अनेक पालक तसेच स्थानिक आमदारांकडून आग्रह केला जात आहे. ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्यानंतर मागील वर्षी प्रमाणे टप्प्याटप्प्याने शहरी भागातील शाळा देखील सुरू करण्यात येतील. याबाबत परिस्थितीचा आढावा शिक्षण विभागाकडून घेतला जात आहे.
- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री