अ.भा.म.सा.प.विदर्भ विभाग द्वारा खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन‌…

449

(संदीप शेंडे,नागपूर)

प्रतिनिधी : अखंड महाराष्ट्र हा “संतांची भूमी” म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात अनेक संत, क्रांतिवीर, समाजसुधारक, शिक्षणतज्ञ, महापुरुष जन्माला आले. प्रत्येक महापुरुषांनी स्वतःला सिद्ध करत देशासाठी व समाजासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिले आहे. या महापुरुषांची महती इतिहास आपल्या प्रभावी तथा परिणामकारक वक्तव्यातून सर्व समाज घटकांना कळावी, समाजाचे परिवर्तन प्रबोधन व्हावे आणि आपल्या उत्कृष्ट वक्तृत्व कलेला वाव मिळावा या उद्देशाने अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे विदर्भ विभाग द्वारा एका नाविन्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन दि. १० जुलै ते ०१ ऑगस्ट पर्यंत करण्यात आले आहे. स्पर्धा 3 गटांमध्ये घेण्यात येणार आहे. पहिला बालवीर गट : इयत्ता १ ली ते ८ वीतील विद्यार्थ्यांसाठी, दुसरा शुरवीर गट : इयत्ता ९ वी ते १२ वीतील विद्यार्थ्यांसाठी, तर तिसरा कर्मवीर गट : इ.१२ वी वरील सर्व विद्यार्थी नागरिकांसाठी खुली ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा परिषदेच्या व्हाट्सअप व फेसबूक ग्रुपवर समूहावर आयोजित करण्यात आलेली आहे.

वक्तृत्व स्पर्धेचे विषय : जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगेबाबा, धरती आबा भगवान बिरसा मुंडा इ. महापुरुषांच्या जीवन कार्याविषयी महती आपल्या वक्तृत्वशैलीतून ऑनलाईन व्हिडिओ द्वारे सादरीकरण करण्याकरिता परिषदेचे मार्गदर्शक संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शरद गोरे आणि आयोजक श्री.आनंदकुमार शेंडे विदर्भ विभाग अध्यक्ष, कार्याध्यक्षा सौ. स्विटी शेंडे, स्पर्धेचे संयोजक श्री.संदीप शेंडे ग्राफिक्स तथा तांत्रिक संयोजक नागपूर विभाग तसेच विदर्भ प्रदेशातील नागपूर व अमरावती विभागातील सर्व पदाधिकारी यांनी राज्यस्तरीय खुलु वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्याकरिता सर्व स्तरातील विद्यार्थी,शिक्षक,साहित्यिक, व्याख्याते, इतिहासकार, प्रबोधनकार आणि कलावंत यांना आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here