मुख्याध्यापक , पर्यवेक्षक व भावी मुख्याध्यापक यांच्यासाठी, “शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन” या विषयावर, फ्री ऑनलाईन कोर्स

708

सतीश लाडस्कर, भंडारा

महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मीपा), औरंगाबाद यांच्या मार्फत मुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच भावी मुख्याध्यापक यांच्यासाठी शालेय प्रशासन व नियोजन या संदर्भात मोफत ऑनलाईन कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्समध्ये शालेय नियोजन व व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर अगदी सखोल व सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कोर्स पूर्ण झाल्यावर निपा, नवी दिल्ली यांच्यामार्फत ऑनलाईन कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

FREE ONLINE COURSE साठी नोंदणी करण्याकरिता जाणून घ्या सोप्या टिप्स.

◆ सर्वप्रथम www.pslm.niepa.ac.in या वेबसाईट ला भेट द्या.

◆ वेबसाईट ओपन झाल्यावर स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात रजिस्टर नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

◆ आता new अकाउंट चा फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये आपली युजर आय डी व पासवर्ड सेट करा व विचारलेली आपली संपूर्ण माहिती भरा. जसे, इ मेल आय डी, नाव, पत्ता, लिंग, शाळेचे नाव, यु डाईस नंबर, माध्यम इत्यादी.

◆ सर्व माहिती सविस्तर भरून झाली की शेवटी सबमिट या टॅब वर क्लिक करा.

◆ आता आपण वर दिलेल्या इ-मेल आय डी वर एक लिंक पाठवली जाईल.

◆ ती लिंक ओपन करा व आपले रजिस्ट्रेशन कन्फर्म करा.

  एवढ्या स्टेप बरोबर follow केल्यास या कोर्सकरिता आपली नोंदणी / रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

★ नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्ष कोर्सला सुरवात कशी करावी?

● सर्वप्रथम www.pslm.niepa.ac.in या वेबसाईट ला भेट द्या.

● आता स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात रजिस्टर च्या बाजूलाच लॉगइन Login हा पर्याय असेल, त्यावर क्लिक करा.

● आता ओपन झालेल्या डॅशबोर्डवर आपण रजिस्ट्रेशन करताना जी युजर आय डी व पासवर्ड वापरला होता, तोच आय डी व पासवर्ड या ठिकाणी टाईप करा.

● शेवटी खाली दिलेल्या लॉगइन या टॅबवर क्लिक करा.

● आता आपण मुख्य डॅश बोर्डवर प्रवेश करू.

● आता वेबसाईट च्या वरच्या बाजूला भाषेचा पर्याय दिलेला असेल, त्यामधून आपल्याला ज्या भाषेतून कोर्स पूर्ण करावयाचा असेल ती भाषा निवडा.

● आता आपल्यासमोर आपण निवडलेल्या भाषेत संपूर्ण माहिती दिसेल.

● या कोर्समध्ये पायाभूत अभ्यासक्रम या सदराखाली एकूण आठ कोर्स दिलेले असतील.

● दिलेल्या आठ कोर्सपैकी क्रमवार एकेक कोर्स ओपन करा.

● प्रत्येक कोर्सवर क्लिक केल्यास सुरुवातीला प्रस्तावना दिसेल, ती काळजीपूर्वक वाचा. व शेवटी दिलेल्या स्टडी मटेरियल या टॅबवर क्लिक करा.

● स्टडी मटेरियल वर क्लीक केल्यावर त्या कोर्सशी संबंधित उपघटक दिसतील, त्यांचे क्रमवार वाचन करा.

● सर्व उपघटकांचे वाचन झाल्यावर स्टडी मटेरियल च्या खाली MCQ असा टॅब दिसेल त्यावर क्लिक करा.

● MCQ मध्ये आपण आतापर्यंत वाचलेल्या घटकांवर आधारित काही वैकल्पिक प्रश्न असतील ते सोडवून घ्या.

● अशाप्रकारे प्रत्येक कोर्समधील उपघटकांचे सविस्तर वाचन करून हा कोर्स तीन आठवड्यात म्हणजेच 21 दिवसांत पूर्ण करून घ्यावा.

★ कोर्स पूर्ण झाल्यानंतर, निपा, नवी दिल्ली मार्फत प्रमाणपत्र कोठून व कसे Download करावे ?

◆ प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी वरीलप्रमाणे तीन आठवड्यांचा कोर्स पूर्ण करणे बंधनकारक आहे.

◆ कोर्स पूर्ण झाल्यावर दोन दिवसांनी याच वेबसाईटवर वरच्या बाजूला दिलेल्या Certificate या टॅबवर क्लिक करा.

◆ आता आपले प्रमाणपत्र ओपन होईल. त्याखाली डाउनलोड सर्टिफिकेट Download certificate असा टॅब दिसेल त्यावर क्लिक केल्यास आपले प्रमाणपत्र डाउनलोड होईल.

अशाप्रकारे सर्व व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावरील शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, प्राचार्य व जेष्ठ शिक्षक या कोर्ससाठी नोंदणी करून कोर्स पूर्ण करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here