प्रतिनिधी
दि.१० जाने.२०२१ रोजी बहिरगाव ता. कन्नड जि. औरंगाबाद येथे राज्यस्तरीय तिफण काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त या महोत्सवाचे आयोजन तिफण काव्य परिषद कन्नड जि. औरंगाबाद तर्फे होत असते. हे संमेलन ग्रामीण भागातच घेतले जाते. याचा उद्देश ग्रामीण भागात कवी, लेखकांचे साहित्य पोहोचवणे हे असते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा पुरोगामी विचारवंत व विद्रोही कविता सादर करणाऱ्या कवयित्री प्रा. प्रतिभा अहिरे सुरडकर मॅडम होत्या. यात निमंत्रित कवि व आयोजन समितीच्या सदस्या म्हणून श्रीमती गीतांजली गजबे मॅडम उपस्थित होत्या. गुंफण शब्दांची.. ही कविता या प्रसंगी श्रीमती गीतांजली गजबे मॅडम यांनी सादर केली. यानिमित्त काव्य प्रतिभेचा सन्मान म्हणून त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.