कोरोना नंतरची शाळा ( भाग १ )
चिंता शाळाबाह्य मुलांची टक्केवारी वाढण्याची
शासनाच्या निर्देशानंतर कोरोना संसर्ग प्रतिबंध नियमावली पाळून ९ ते १२ पर्यंतचे वर्ग उघडले खरे पण तिथेही १०० टक्के विद्यार्थी उपस्थित नाहीत, ते उपस्थित असावे असे सक्ती ही नाही,उपस्थिती ऐच्छिक आहे.यातही शहरी भागातील बहुतांश ऑनलाईनवाले विद्यार्थी यांनी ऑनलाईन हीच शिक्षणाची पद्धत स्वीकारली आहे. त्यामुळे १०० टक्के उपस्थिती मधला हा टक्का वगळला तरी ऑफलाईन असणारा टक्का ही पूर्णतः शाळेत आलेला नाही.
खरी चिंता या ऑफलाईन मध्ये असणाऱ्या अनुपस्थित विद्यार्थ्यांची लागली आहे. हा वयोगट जेमतेम नुकताच कष्टकरी वर्गात मोडण्यास सज्ज असलेला तो यासाठी सुट्ट्याच्या काळात शेतात,कारखाने,हॉटेल्स,वीटभट्ट्यया ठिकाणी ही मुलं काम करत होती व आहेत.मुली शेतात व घरकामात सक्रिय झाल्या होत्या. तुरळक मुली तर मोठ्या शहरात शेती व तत्सम कारखाण्यात कामे करत होती व आहेत.
ग्रामीण व शिक्षणाची अनास्था असणाऱ्या आदिवासी पाड्यावर व दुर्गम ग्रामीण भागात मुलींना जेमतेम १० पर्यंत शिकवले जाते.त्यामागचे कारणे शोधली तर उच्च शिक्षणासाठी शिक्षण हे क्वचितच मिळणारं कारण.मोठ्या प्रमाणावर मिळणार कारण बघितलं तर असे समजेल की आजूबाजूच्या मुली शाळेत जात आहेत त्यामुळे परंपरागत जेमतेम १० पर्यंत शिक्षण देणे एक रुटीन पडलेली आहे. व त्यानंतरच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागात शाळाच नसल्याने तिथेच शिक्षण ब्रेक होते आहे.अशी पालकांची मनःस्थिती असलेल्या ठिकाणी या पालकांनी मूल घरी असतांना होणारी उपलब्धी लक्षात घेतली आहे, एरव्ही कधी नव्हे एव्हढा काळ या मुलांनी घरात घालवला आहे.या वयातील मुलांची घरकामातील उपयोगिता इतर कामातून मिळणारा आर्थिक लाभ कधी नव्हे ती आता कोरोना काळात पालकांना कळला आहे.आता जर ही मुलं शाळेत जायायला निघाली तर घरकामात आईला मुलीची कमतरता भासेल कारण गेल्या १० महिण्यात आईचे बरेच कामे या मुली करत होत्या तर आईची दैनंदिनी बदलली होती ती पूर्ववत करण्यास तिला जड जाणार.जर ही मुलं आर्थिक मिळकत घरी आणत होती तर त्या मिळकती प्रमाणे घरखर्च ही वाढलेला असणार पण शाळेत ही मुलं गेल्यावर बदललेला घर खर्च पूर्ववत करावा लागणार,म्हणजे ग्रामीण भागात या मुलांच्या शाळेत जाण्याने थोडीशी जीवनशैलीच बदलणार.
हे सर्व जाणून सुद्धा शिक्षणाबद्दल आस्था दाखवत किती पालक या अनुपस्थित मुलांना कधी उपस्थित करतील ही चिंता वाटते आहे.ही मुलं उपस्थित झाली तर शिक्षणाच्या प्रवाहात दिसतील नाहीतर ती कायमचीच शिक्षणप्रवाहाच्या बाहेर पडली जातील.
शासन नित्य प्राथमिक गटातील व थोडाफार उच्च गटातील शाळाबाह्य मुलं शोधून त्यांना शाळेत प्रवेशित करत अर्थात हे कार्य आपले शिक्षकच करतात.त्यासाठी खास बालरक्षक चळवळ राबवली जाते.आता ही चळवळ अधिक सक्रिय व गतिमान करणे गरजेचे झाले आहे.
क्रमशः
पुढच्या भागात- कोरोना नंतरची प्राथमिक शिक्षणातील बदललेली गुणवत्ता व शिक्षकांपुढील आव्हाने
✒️ नितीन नंदा प्रभू केवटे
🪀9527311125