राज्यातील ४०८ शाळांचे‌ होणार सक्षमीकरण ;प्रत्येक गट शहर ,साधन केंद्रतुन निवडणार एक शाळा.

221


राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान


हिंगणघाट ( प्रभाकर कोळसे) महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका या स्थानीक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा विकास करण्यासाठी ‘ राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान’ चा प्रारंभ राज्यात लवकरच होणार आहे.पहिल्या टप्प्यात ४०८ आदर्श शाळांची निवड करुन त्यांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने या उपक्रमाचा प्रस्ताव तयार केला असून त्याची अंमलबजावणी येत्या १२ जानेवारी( राजमाता जिजाऊ) जयंती पासून होण्याची शक्यता आहे. या उक्रमाअंतर्गत मुला , मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे ,पिण्याचे पाणी, आकर्षक इमारत, पर्यावरणपूरक रंगसजावट,शिक्षणास पोषक शैक्षणिक परिसर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, ग्रंथालय उभारणी,क्रिडा व शारीरिक शिक्षणासाठी चे साहित्य, विज्ञान नगरीची उभारणी आदी सुविधा दिल्या जाणार आहेत.
@ नियमित मुल्यांकन होणार
सरकारी शाळांबद्दल पालकांचा विश्र्वास वाढावा, पटसंख्या वाढावी व राज्यातील शाळांचा विकास करण्यासाठी प्रत्येक गट ,शहर साधन केंद्रातुन एक आदर्श शाळां निवडली जाईल पहिल्या टप्प्यात ४०८ शाळा निवडल्या जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचा स्वतंत्र रेकार्ड जतन करून त्यांच्या प्रगतीचे नियमित मुल्यांकन होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here