सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी:
सेतू अभ्यासक्रम राबविण्याविषयक सविस्तर सर्व सूचना शिक्षक व विद्यार्थ्यासाठी अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत. तसेच संबोध अधिक स्पष्टनेकरिता ई साहित्याच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत. दि. १ जुलै २०२१ ते १४ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये सेतू अभ्यासक्रमाची अमलबजावणी एकूण ४५ दिवसांकरिता करावयाची आहे.
सदर सेतू अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या अभ्यासक्रमाची अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करण्यात यावी मागील इयत्ताच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासक्रमातून संपादित होतील याकरिता सेतु अभ्यासक्रम राबविण्याची कार्यवाही आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी सदर अभ्यासक्रमाच्या पीडीफ फाईल संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट करूनही वापरता येतील.