या ट्रिकद्वारे Whatsapp चे दोन अकाउंट वापरा, एकाच मोबाईल फोनवर!

387

सतीश लाडस्कर,भंडारा

आता जवळजवळ सर्वच मोबाईल फोनमध्ये ड्युएल सिमकार्ड वापरले जातात.

पण बरेच युजर्स त्यापैकी एकाच नंबरवरून Whatsapp वापरत असतात. प्रत्येक स्मार्टफोन मध्ये अशी एक सुविधा उपलब्ध आहे की जिच्याद्वारे आपण आपल्या दोन्ही नंबरवरून दोन वेगवेगळे Whatsapp अकाउंट वापरू शकतो. ज्यांच्या मदतीने आपण आपल्या वैयक्तीक वापरासाठी, व कार्यालयीन वापरासाठी असे दोन भिन्न खाते ठेवू शकतो.

यासाठी आपल्याला कोणतेही वेगळे app मोबाईल मध्ये इन्स्टॉल करण्याची गरज नाही. प्रत्येक मोबाईल फोन मध्ये हे फिचर सेटिंग मेन्यू मध्ये दिलेले असते. अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या Whatsapp चे क्लोन ( जुळे app) इन्स्टॉल करू शकतो. त्यासाठी आपल्याला Dual Apps किंवा App Clone या खास फिचर चा वापर करावा लागेल.
विविध कंपनीच्या फोनमध्ये हे फिचर वेगवेगळ्या नावाने उपलब्ध आहे. या फिचर चा वापर करून आपण कोणत्याही app चे जुळे किंवा डुप्लिकेट app तयार करून ते वापरू शकतो.

★ विविध कंपन्यांच्या मोबाईल फोनमध्ये हे फिचर कोणत्या नावाने आहे ते👇 खाली दिले आहे.

◆ Samsung – Dual Messenger.

◆ Xiaomi – Dual Apps.

◆ Oppo – Clone Apps.

◆ Vivo – App Clone.

◆ Huawei – App Twin.

◆ Honor – App Twin.

◆ Asus – Twin Apps.

■ एकाच मोबाईल फोन मध्ये दोन Whatsapp अकाउंट वापरण्याकरिता खालील👇 स्टेप्स follow करा.

1) सर्वप्रथम आपल्या फोनमधील सेटिंग ओपन करा.

2) आता खाली दिलेल्या पर्यायांपैकी Dual App / Clone App किंवा Twin App हे फीचर शोधा व त्यावर क्लिक करा.

3) आता आपल्यासमोर app ची यादी सादर होईल, त्यापैकी Whatsapp हे app सिलेक्ट करा.

4) लगेच Whatsapp चे जुळे app इंस्टॉल होईल.

5) आता इन्स्टॉल झालेले दुसरे Whatsapp ओपन करा.

6) त्यानंतर आपल्या दुसऱ्या मोबाईल नंबरवरून Whatsapp अकाउंट तयार करा.

अशाप्रकारे या फिचर चा वापर करून आपण एकाच फोनमध्ये आपल्या दोन्ही नंबरवरून Whatsapp अकाउंट वापरू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here