शशिकांत इंगळे,अकोला
वार्ताहर: भारतात केंद्र शासनाचे ६२ लाख पेन्शनधारक आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने दिलासा देणारी एक बातमी दिली आहे. पेन्शनधारकांना पेन्शन स्लीप त्यांच्या विभागांमध्ये जाऊन मिळवावी लागत होती. परंतु आता केंद्र सरकारच्या पर्सनल डिपारमेंटने पेन्शन देणाऱ्या बँकांना पेन्शन स्लिप पेन्शनधारकाच्या मोबाईल नंबर वर एसएमएस आणि ई-मेल द्वारे पाठवण्यास सांगितला आहे. त्यासाठी बँकांनी पेन्शनधारकांचा नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरावा असे सांगितले आहे. केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे.