बालकांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहावे –किरण सुर्यवंशी

233


सोलापूर – महिला बालविकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपल्या बालकांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन मोहोळ तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. किरण सुर्यवंशी यांनी केले. शेंबडे वस्ती (कोन्हेरी ) ता. मोहोळ येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत नवीन अंगणवाडी वर्ग खोलीचे उद्घाटन श्री. सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अंगणवाडी पर्यवेक्षीका सौ. सुवर्णा माशाळे, विस्तार अधिकारी सांख्यिकी श्रीमती शीलादेवी दाढे, बाळासाहेब शेळके, विष्णु शेंबडे, संजय जरग, विनायक डोंगरे, विष्णु लवटे हे उपस्थित होते.
शेंबडे वस्ती , कोन्हेरी या वस्तीवर अंगणवाडी केंद्र सुरू झाल्यापासून पत्र्याच्या शेड मध्ये वर्ग भरत होते. या अंगणवाडी मध्ये सुमारे 50 विद्यार्थी लाभ घेत होते. बांधकाम झाल्याने विद्यार्थ्यांची उत्तम सोय झाली आहे. या वस्तीवरील श्री. विष्णु शेंबडे यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. येथील ग्रामस्थांचे अंगणवाडी साठी नेहमीच सहकार्य मिळत आहे.
यावेळी सौ. सुवर्णा माशाळे व शीलादेवी दाढे, बाळासाहेब शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अंगणवाडी परिसरात उपस्थित पाहुणे, पालक व विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका श्रीमती वैशाली कौलगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश शेळके, संतोष शेंबडे, अमोल शेळके, औदुंबर रंधवे राहुल शेंबडे, सागर शेंबडे, मनीषा सकट यांनी परिश्रम घेतले. यावेळी गावातील अंगणवाडी सेविका श्रीमती संगीता शेटे, रंजना डोंगरे, कल्पना आयवळे, नूरजहां मुजावर, मदतनीस भागबाई जरग, जयश्री कांबळे, राणीबाई लवटे उपस्थित होते. या कार्यक्रमास वस्तीवरील माता पालक यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यांनी या कार्यक्रमात हिरीरीने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here