Truecaller वर आपलं नाव चुकीचं येत असल्यास, या ट्रिकद्वारे आपण आपलं नाव बदलवू शकता!

414

Truecaller हे विविध कॉलर आय डी app मधील सर्वात जास्त वापरले जाणारे app आहे. हे app आपल्या मोबाईल फोनमध्ये असल्याने आपल्या फोनमध्ये सेव्ह नसलेल्या नंबरवरून कॉल आला तरी तो नंबर कोणाचा आहे हे आपल्याला कळते. परंतु, अनेकदा या app मध्ये दर्शविलेले नाव चुकीचे किंवा अवास्तव दिसते. Truecaller मध्ये बऱ्याचदा आपला नंबर देखील चुकीच्या नावाने दाखवला जातो. असे झाले असेल तर आपण आपले नाव बदलण्याची सुविधा app मध्ये उपलब्ध आहे.

■ Truecaller वरील आपले नाव बदलण्यासाठी खालील👇 टिप्स Follow करा.

● सर्वप्रथम आपल्या फोनवर Truecaller अॅप उघडा.

● आपण पहिल्यांदाच app डाउनलोड केले असेल तर प्रथम लॉगइन करावे लागेल.

● लॉगइन झाल्यावर आपल्याला आपले प्रोफाइल एडिट करण्याचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

● आपला नंबर Truecaller वर कोणत्या नावाने सेव्ह आहे ते आपल्याला दिसेल. चुकीचे असल्यास, आपले नाव या ठिकाणी आपण हवे तसे संपादित करू शकतो.

● आपण केलेला नावातील बदल एक किंवा दोन दिवसात अपडेट झालेला दिसून येईल.

★ जर आपल्याला Truecaller वर आपला नंबर ठेवायचा नसेल तो आपण काढून घेऊ शकतो.

■ Truecaller वरून आपला नंबर काढून घेण्यासाठी खालील 👇 टिप्स Follow करा.

● प्रथम फोनमधील Truecaller अॅप उघडा.

● वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या मेनू वर क्लिक करा.

● आता सेटिंग्ज हा पर्याय निवडा.

● त्यानंतर (Privacy centre) गोपनीयता केंद्र हा पर्याय निवडा.

● आता “खाते निष्क्रिय करा” या पर्यायावर क्लिक करा व नंतर OK हा पर्याय निवडा.

● एवढी प्रक्रिया पूर्ण झाली, की Truecaller अनलिस्ट पृष्ठावर जा.

● आता आपला मोबाइल नंबर टाईप करा व विश्लेषक पर्यायावर क्लिक करा.

● आता आपल्याला नंबर काढून टाकण्याचे कारण विचारले जाईल ते सादर करा.

● त्यानंतर दिलेला कॅप्चा कोड प्रविष्ट करा व शेवटी, “यादी रद्द करा” या पर्यायावर क्लिक करा.

● 24 तासांच्या आत Truecaller मधून आपला नंबर काढून टाकला जाईल.

— सतीश लाडस्कर,भंडारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here