शशिकांत इंगळे,अकोला
वार्ताहर: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण तर्फे अनुसूचित जातीच्या युवक-युवतींना संगणक हाताळणी तसेच शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण चार महिण्यासाठी पूर्णतः मोफत असून हे सटाणा, देवळा, चांदवड, सुरगाणा, नांदगाव व मालेगाव या तालुक्यातील युवक-युवतींना मिळणार आहे. न्यूक्लिअर बजेट योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या व आदिम जातीच्या पात्र लाभार्थी असलेल्यांना मासेमारी जाळे खरेदीसाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे. अनुसूचित जातील ज्यांच्याजवळ रेशन कार्ड नाही. अशा लाभार्थींना तालुक्यातील तहसील कार्यालयात अर्ज करावे लागणार आहेत. यासाठी शासकीय फी प्रकल्प कार्यालयाकडून दिली जाणार आहे. करीत अधिक माहितीसाठी (०२५९२) २५०१०१/ २५०१०२ या नंबर वर संपर्क करावा. प्रशिक्षणासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना दिनांक २३ जून ते १२ जुलै २०२१ या कालावधीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, कळवण, नवीन प्रशासकीय इमारत, कोल्हापूर फाटा येथे अर्ज करण्याबाबत आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विकास मीना यांनी केले आहे.