शासन निर्णय दिनांक २५.०१.२०१७ अन्वये शाळा प्रवेशासाठी ३० सप्टेंबर हा मानिव दिनांक घोषित करण्यात आलेला होता, उपरोक्त संदर्भिय शासन निर्णयान्वये मानिव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यातील जन्म असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये अडचणी निर्माण होत आहे, म्हणून मानिव दिनांक बदल्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून फक्त शैक्षणिक २०२१-२२ साठी किमान / कमाल वयोमर्यादा पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.
