सरकारी कर्मचाऱ्यांच्या ओव्हरटाईम भत्ता तसेच इतर खर्चात 20 टक्के कपात करणार; केंद्र सरकारने घेतला निर्णय

317

शशिकांत इंगळे,अकोला

वार्ताहर: कोरोना काळामध्ये शासनाचा वाढता खर्च आणि घटलेले उत्पन्न यामुळे केंद्र सरकारची विविध कार्यालये तसेच मंत्रालयात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या ओव्हरटाईम भत्ता आणि इतर काही सुविधा बाबत खर्चांवर 20 टक्के कपात करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अर्थमंत्रालयाने गेल्या वर्षी दोन वेळा विविध विभागांमध्ये तसेच मंत्रालयामध्ये होणारा खर्च कमी करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र त्यावेळी भत्ता आणि इतर काही सुविधांमध्ये कपात करण्यात आले नव्हते.
परंतु आता 20 टक्के कपातीचा गृहमंत्रालयाने निवेदन गुरुवारी जारी केले आहे. हे निवेदन सगळ्या सचिव, केंद्रीय मंत्रालय आणि विभागाच्या आर्थिक सल्लागार यांना पाठवण्यात आलेले आहे. वायफळ खर्च थांबवा आणि ओव्हटाईम भत्ता आणि इतर काही सुविधांवर करण्यात येणार्‍या खर्चावर 20 टक्के कपात करावी. असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याचे वृत्त आजतक या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या प्रसिद्धीपत्रकावर आज मंत्रालयाशी निगडित असणाऱ्या एका अधिकाऱ्याने या देशांवर बोलताना सांगितले आहे. की “या सगळ्या गोष्टींवर होणारा खर्च कमी करण्याची हीच खरी योग्य वेळ आहे. कारण सध्या पूर्ण क्षमतेने कार्यालय सुरू झालेले नाहीत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here