विश्वांंबर बोकडे,
मुल्यांकन पद्धतीच्या आधारे दहावीचा निकाल देण्याचे नियोजित असल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी सदरची प्रक्रिया सुरू केली असून शाळांनी राज्य मंडळाला कसा व कोणत्या स्वरूपात गुण पाठवावेत यासंदर्भातील नियोजित आराखडा आज दिनांक एक जून रोजी प्रसिद्ध केल्या जाण्याची शक्यता आहे
शिक्षक मुख्याध्यापक मुख्याध्यापक यांनी इयत्ता नववी व दहावीतील झालेल्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांच्या माहितीचे संकलन करावे लागणार आहे. सध्या कोरोना आपत्ती परिस्थिती पाहून दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तसेच नवीन अध्यादेशाच्या आधारे दहावीचा निकाल हा इ.नववी मधील गुण व शाळा स्तरावरील दहावीतील घेतलेल्या परीक्षांच्या गुणांच्या आधारे घेण्याचे स्पष्ट केले आहे.
त्यानुसार शाळांनी विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात विद्यार्थ्यांचे गुण कोणत्या स्वरूपात भरून पाठवावेत यावरचा आराखडा राज्य मंडळा कडून तयार केला जात आहे. तो आज १जून रोजी प्रसिद्ध होणार आहे.