अध्यापनाची नवी पद्धत घडवणार गुणवत्तापूर्ण शिक्षक.

276


प्रभाकर कोळसे,वर्धा

भारतातील सर्व शिक्षण शास्त्र महाविद्यालय व संस्थांचे नियमन तसेच अध्यापन शिक्षणाचे अभ्यासक्रम यांची मान्यता व नियंत्रण करण्यासाठी 1996 मध्ये संसदेच्या कायद्यानुसार राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली भारतातील सर्व राज्यांमध्ये 18000 अध्यापक शिक्षण संस्था कार्यरत आहेत या संस्थांमध्ये पदवीनंतर बीएड व बीपीएड तसेच पदव्युत्तर एम एड,एम पी एड, अभ्यासक्रम चालविण्यात येतात मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये अध्यापक शिक्षणामध्ये मोठे बदल सुचविण्यात आले आहेत या बदलानुसार स्वतंत्र शिक्षणशास्त्र महाविद्यालय अस्तित्व संपुष्टात आले आहे. एकात्मिक अध्यापक शिक्षक शिक्षण हा चार वर्षे कालावधीचा आठ सत्रांचा बारावी नंतर च्या‌ प्रवेशाच्या अभ्यासक्रम सुचविण्यात आला आहे ‌.
या चार वर्षाच्या एकात्मिक अभ्यासक्रमांमध्ये बाल्यावस्था पूर्ण संगोन शिक्षण, प्राथमिक व पूर्व प्राथमिक स्तरासाठी, माध्यमिक स्तरासाठी गणित व शास्त्र एकात्मिक अध्यापक शिक्षण व शारिरीकशिक्षण एकात्मिक अध्यापक शिक्षण या अभ्यासक्रमांचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे.
एकात्मिक अध्यापक शिक्षण अभ्यासक्रम बहु शास्त्रीय महाविद्यालयामध्ये म्हणजे म्हणजे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मध्ये शिक्षण शास्त्र विभाग सुरू करून या विभागांतर्गत सुरू करण्यात येतील. किंवा विद्यापीठाच्या शिक्षण शास्त्र व शारिरीक शिक्षण शास्त्र विभागामध्ये सुरू करता येतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्रमाणे शैक्षणिक वर्ष 2021 -22 मध्ये सुरु करण्याविषयी सुचवले होते. तू राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने मे 2021मध्ये सर्व साधारण सभेमध्ये आता हे अभ्यासक्रम 2022-23 मध्ये सुरू करण्याविषयी ठरविले आहे‌‌.
एकुणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात गुणवत्तापूर्ण शिक्षक निर्मितीसाठी व शालेय शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी एकात्मिक अध्यापक शिक्षण कार्यक्रम मोठी भूमिका पार पाडणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here