शिक्षक फ्रन्टलाईन वर्कर त्यांनाही मिळणार विमा संरक्षण…!

230

शशिकांत इंगळे

नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समिती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासोबत नुकतीच बैठक झाली. यावेळी या बैठकीत शिक्षण अधिकारी डॉ. राहुल चौधरी हे उपस्थित होते. कोरोना कालावधीमध्ये जिल्हाभरात प्राथमिक शिक्षकांना सक्षम अधिकार्‍यांचे लेखी आदेश न देता. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्राचा गैरवापर करून. शिक्षकांना केंद्रप्रमुख मार्फत भयभीत करण्यात आले होते. प्राथमिक कर्मचाऱ्यांना एकाच वेळी दोन-तीन आदेश देण्यात आले मात्र यामध्ये महिला कर्मचारी यांना दिवसभर शाळेत थांबण्यास संदर्भात शिक्षकांच्या संतप्त प्रक्रिया येताच, नंदुरबारजिल्हा परिषदेतील सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने मुख्यकार्यकारी यांना निवेदन देत या कामाचा तीव्र निषेध केला आहे. निवेदनाची दखल घेऊन कार्यकारी अधिकारी माननीय श्री. गावडे साहेब यांनी शिक्षक समन्वय समितीचे शिष्टमंडळ चर्चेसाठी बोलवले होते. या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी माननीय डॉ. सुधीर खांदे हे सुद्धा उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी कोरोना काळात दिलेल्या सेवेचे आणि मदत कार्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गावडे साहेब आणि उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले. संघटनेच्यावतीने गोपाल गावीत, संजय वळवी, पंकज भदाणे, संदीप रायते, इत्यादी उपस्थित होते. यावेळी संघटनेने पुढील मागण्या साठी निवेदन दिले आहेत.
कोरोना काळात शिक्षक फ्रन्टलाइन वर्कर म्हणून काम करतात त्यामुळे शिक्षकांना विमा संरक्षण मिळावे. आणि शिक्षकांच्या कुटुंबीयांसह लसीकरण, लसीकरणाच्या दिवशी पोलीस संरक्षण मिळणे, कोरोना बाधित शिक्षकांना राखीव बेड, कोरोना सेवा करताना मृत झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून मदत मिळणे, आदी मागण्या मान्य करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी माननीय श्री. सुधीर खांदे, शिक्षणाधिकारी माननीय डॉ. राहुल चौधरी यांनी शिक्षकांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत पुढील मागण्या मान्य केल्या आहेत.

मान्य झालेल्या मागण्या

सर्व शिक्षकांचे विमा संरक्षणाचे प्रस्ताव तातडीने मागून घेऊन प्रशासन पाठपुरावा करणार, कोरोना बाधीत होऊन मृत झालेल्या शिक्षकांच्या पाल्यांना प्राधान्याने अनुकंपा तत्वावर सेवेत घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार, कोरोना बाधित शिक्षकांसाठी राखीव बेड ठेवले जातील, शिक्षक तसेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना प्राधान्याने लसीकरण करून घेतले जाईल. याबाबत तातडीने तसे आदेश दिले जातील, कोविड कामासाठी एका शिक्षकाला एका वेळी एकच काम आणि तेही तहसीलदार गटविकास अधिकारी आणि त्यांच्या सक्षम अधिकारी यांच्या संयुक्त आदेशानेच दिले जाणार, स्लीपा वाटण्याचे काम शिक्षकांना दिले जाणार नाही. शिक्षकांचा कामाचा कालावधी निश्चित केला जाईल. त्याबाबत त्याचे आदेश देणार, सुट्टी वेळी केलेल्या कामाचे दिवस विशेष रजा म्हणून सेवा पुस्तके मध्ये नोंद घेण्यासाठी मार्गदर्शन मागविणार, दुर्धर आजाराने ग्रस्त दिव्यांग स्तनदा माता यांना कामावरून वगळणार, लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्याची जबाबदारी गावातील हायस्कूल व जिल्हा परिषद यातील शिक्षकांकडे देऊन शिक्षक बांधवांवर नियंत्रण आपले यंत्रणेच्या राहील. ग्रामसेवक किंवा तलाठी यांची नियंत्रण असणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here