अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ ( ABRSM ) आयोजित अखिल भारतीय निबंध स्पर्धा 2021

397

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या ( ABRSM ) च्या वतीने ( महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाची राष्ट्रीय स्तरावरील संघटना ) महाविद्यालय व शालेय अशा दोन गटात शिक्षकांसाठी राष्ट्रीय स्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शिक्षक बंधू भगिनींनी सहभाग घ्यावा ही विनंती.

स्पर्धेसाठी विषय

1 ) शिक्षणाच्या माध्यमातून “एक भारत,श्रेष्ठ भारत” ही भावना वाढविणे.

2 ) ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व.

3 )मुलांच्या सर्वांगीण विकासात मातृभाषेची भूमिका

4 ) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020:- संधी आणि आव्हान.

स्पर्धेसाठी अटी व नियम

1) स्पर्धकांना प्रथम 100 रुपये भरून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागेल.
https://abrsm.in

2) वरील पैकी एका विषयावर इंग्रजी, हिंदी किंवा मराठीत निबंध लिहायचे आहे.
शब्दमर्यादा:- 3000 ते 5000 शब्द.

3) निबंधाच्या पहिल्या पानावर फक्त आपला रजिस्ट्रेशन नंबर लिहायचा आहे. नाव लिहू नये.

4) निबंधाची सॉफ्ट कॉपी पीडीएफ स्वरूपात रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 31 मे 2021 पर्यंत वेबसाईटवर अपलोड करणे.:– https://abrsm.in

5) राज्यस्तरावर निवड झालेले 10 निबंध अंतिम स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर पाठविले जातील.यातून अंतिम 10 स्पर्धकांची निवड करण्यात येईल.

6) 31 जुलै ला निकाल जाहीर केला जाईल.

7)सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

8) स्पर्धेत खाजगी, जिल्हा परिषद व महानगरपालिका शिक्षक सहभाग घेऊ शकतात.

पारितोषिक

प्रथम क्रमांक 21000 रुपये
द्वितीय क्रमांक 15000 रुपये
तृतीय क्रमांक 11000 रुपये
उत्तेजनार्थ 5100 रुपये चे 7 पुरस्कार

अधिक माहिती साठी संपर्क

के. आर. तुंगार सर
अध्यक्ष
9850119719

प्रकाश देशपांडे सर
मुख्यसचिव
9403463664

कृष्णा हिरेमठ सर
राज्य स्पर्धा संयोजक
9028853787

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ सर्व पदाधिकारी

टीप:– सविस्तर माहिती साठी:- https://abrsm.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here