ही ट्रिक वापरा आणि आपल्या जी-मेल (Gmail) ला एकापेक्षा जास्त अकाउंट add करा.

556


वारंवार मेल (mail) चेक करण्यासाठी वेगवेगळे अकाउंट जसे, ( google, hotmail, office365, Yahoo, i-cloud ) उघडावे म्हणजेच स्विच करावे लागत असल्याने जर आपण त्रस्त असाल, तर खाली दिलेल्या टिप्स प्रमाणे सेटींग करून घेतल्यावर यापुढे आपल्याला असा त्रास होणार नाही.

आपण बरेच जण mailing करीता विविध माध्यमांचा वापर करत असतो. त्यापैकीच जीमेल (Gmail) हे एक माध्यम आहे.

आणि आता जीमेल वर एकाहून अधिक अकाउंट्स (Accounts) जोडता येणं शक्य आहे. त्यामुळे, Yahoo, Hotmail, आणि इतरही अनेक इमेल माध्यमांद्वारे येणारे मेल एकाच ठिकाणी वाचता येणं शक्य होणार आहे आहे. तसेच Gmail वरून या सर्व माध्यमांद्वारे मेल पाठवता येणार आहेत. तसेच फोल्डर्स व फाईल्सही मूव्ह करता येतील.

  जीमेल ला इतर अकाउंट कसे जोडता येतील? चला तर जाणून घेऊया!

खालील स्टेप्स follow करा.

◆ सर्वप्रथम आपले जीमेल ( Gmail ) ओपन करा.

◆ वरील उजव्या कोपऱ्यात असलेल्या प्रोफाइल पिक्चर वर / नावाच्या आद्याक्षरावर क्लिक करा.

◆ आता Add Another Account हा पर्याय निवडा.

◆ त्यानंतर दिलेल्या अकाउंट मधील जे आपल्याला जीमेल ला जोडायचे असेल त्यावर क्लिक करा.

◆ आता जिमेलफाय हा पर्याय निवडा. त्यामुळे Gmail चे सर्व फीचर्स तुमच्या अकाउंटला जोडले जातील.

◆ सर्व इ-मेल्स एकत्र पाहण्यासाठी डाव्या कोपऱ्यात असलेल्या Menu मधील ऑल इनबॉक्सेस ( All Inboxes ) वर क्लिक करा.

—- सतीश लाडस्कर,भंडारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here