शशिकांत इंगळे-
वार्ताहार(चंद्रपूर) : विद्यार्थ्यांचे ज्ञान हे फक्त पाठ्यपुस्तका पुरतेच मर्यादित न ठेवता त्यांचा सर्वांगाने विकास व्हावा. हा उद्देश समोर ठेवून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक ,सांस्कृतिक व अध्यात्मिक असा एकत्रित सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने नेहमीच नवनवीन उपक्रम हे राबविले जात असतात. आणि याचाच एक भाग म्हणून आदिवासी उपाय योजना नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील २८ जिल्हा परिषद शाळा व ८ आश्रम शाळा यांची निवड ही बाला पेंटिंगसाठी करण्यात आली आहे. यासाठी निधी म्हणून या शाळांना ९९ लाख ३ हजार रुपयांचा रुपये आलेले आहेत. यामुळे शाळेचा एकूणच संपूर्ण चेहरामोहरा बदलून जाणार यात काही एक शंका नाही. पाठ्यपुस्तकातून विद्यार्थी शिकत असले तरी शाळेचे शैक्षणिक वातावरण व शालेय परिसर हे सुद्धा विद्यार्थ्यांच्या ज्ञानात नेहमी भर टाकत असतात. त्यातून विद्यार्थी हा शाळे प्रति आकर्षित व्हावा. त्याचे शाळेमध्ये त्याचे मनोरंजन व्हावे. एकूणच त्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळावे व शिक्षण हे कंटाळवाणे न होता. आनंद देणारे असावे. यासाठी शाळांमधल्या प्रत्येक जागेवर आणि प्रत्येक भागावर बाला पेंटिंग अंतर्गत पेंटिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष जाईल, नजर पुरेल तेथून तो काहीतरी शिकणार आहे. सन २०२०-२१ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना मधून या ८ शासकीय आश्रम शाळा आणि २८ जिल्हा परिषद शाळा यामध्ये हा संपूर्ण जो निधी आहे. तो वाटप करण्यात आलेला आहे. आणि लवकरच या कामाचा शुभारंभ होणार आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोणा महामारी मुळे विद्यार्थी आणि शाळा यांच्यामध्ये जी दुरी निर्माण झाली आहे. ती नक्कीच या पेंटिंग मुळे विद्यार्थ्यांना शाळांना जोडण्याचे कार्य करेल यात काही एक शंका नाही.
निवड करण्यात आलेल्या आश्रमशाळा
▪️शासकीय आश्रम शाळा बोर्डा▪️शासकीय आश्रम शाळा देवाडा
▪️शासकीय आश्रम शाळा जिवती ▪️शासकीय आश्रम शाळा मरेगाव▪️शासकीय आश्रम शाळा पाटण▪️शासकीय आश्रम शाळा रुपापेठ▪️शासकीय आश्रम शाळा मंगी▪️शासकीय आश्रम शाळा देवई
जिल्हा परिषद शाळा
◼️राजुरा
जि. प. प्राथमिक शाळा, मंगी
जि. प. उच्च प्राथमिक शाळा, टेंबुरवाही
जि.प. उच्च प्राथमिक शाळा, देवाडा
◼️कोरपना
जि.प.उच्च प्राथमिक शाळा, कोरपना
जि. प. प्राथमिक शाळा, रुपापेठ
जि.प. उ. प्राथमिक शाळा नांदा (मराठी)
◼️जिवती
जि.प. उच्च प्राथमिक शाळा,कुंभेझरी
जि.प.प्राथमिक शाळा, सेनगाव
जि.प. उच्च प्राथमिक शाळा टेकामांडवा
◼️बल्लारपूर
जि. प. प्राथमिक शाळा, इटोली,
जि. प. प्राथमिक शाळा, कोर्टी मुक्का
जि. प. प्राथमिक शाळा, कवडजई
◼️चंद्रपूर
जि.प.उ. प्राथमिक शाळा,अजयपूर
जि.प.उ. प्राथमिक शाळा,लोहारा
◼️गोंडपिंपरी
जि.प.उ. प्राथमिक शाळा,करंजी
जि.प.उ. प्राथमिक शाळा,बोरगाव
जि.प.उ. प्राथमिक शाळा,धानापूर
◼️पोंभुर्णा
जि.प. प्राथमिक शाळा, डोंगरहळदी तु.
जि.प. प्राथमिक शाळा, आष्टा
जि. उच्च प्राथमिक शाळा, चिंतधाबा
◼️मूल
जि.प. उच्च प्राथमिक शाळा भवराळा
जि.प. प्राथमिक शाळा काटवन
जि.प. उच्च प्राथमिक शाळा नल्लेश्वर
◼️सावली
जि.प. उच्च प्राथमिक शाळा खेडा
जि.प. उच्च प्राथमिक शाळा सादागड
◼️सिंदेवाही
जि.प. उच्च प्राथमिक शाळा सरडपार
जि.प. उच्च प्राथमिक शाळा कच्चेपार
जि.प. उच्च प्राथमिक शाळा पेटगाव