Whatsapp वर येणाऱ्या फोटो व विडिओ मुळे तुमच्या फोन गॅलरीचा स्टोरेज फुल्ल होतो का? व्हाट्सऍप वरील फोटो, विडिओ गॅलरीत save होऊ नये यासाठी अशी करा सेटिंग.

547

व्हाट्सऍप हा आजच्या घडीला आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. आपण व्हाट्सऍप वर अनेक गृपवर ऍड असतो, तसेच बऱ्याच लोकांशी चॅट पण करत असतो. प्रत्येक दिवशी Whatsapp वर आपल्याला शेकडो मेसेजेस येत असतात. त्यामध्ये काही फोटो, व्हिडिओ, pdf, youtube लिंक्स अशा अनेक प्रकारचे आवश्यक तसेज काही अनावश्यक मेसेजेस असतात.

बऱ्याचदा एकच फोटो किंवा व्हिडिओ, आपल्याला अनेक चॅट वरून किंवा ग्रुपवरून आलेला असतो. तो जेवढया वेळा आला असेल तितक्या वेळा तो फोटो आणि व्हिडीओ आपल्या फोन गॅलरीत आपोआप सेव्ह होतात. त्यामुळे आपल्या फोनचा स्टोरेज लवकर फुल्ल होतो. परिणामी आपला फोन हँग होतो व त्याची कार्यक्षमता ही क्षीण होत जाते. मग आपल्याला वारंवार ते फोटो व व्हिडिओ डिलीट करावे लागतात.

हे टाळण्यासाठी, व्हाट्सऍप वर येणारे फोटो, व्हिडिओ फोन गॅलरीत सेव्ह होऊ नये यासाठी एक सेटिंग उपलब्ध आहे. तिचे नाव आहे, मीडिया विझिबिलिटी ( Media Visibility ). एकदा ही सेटिंग ऑफ केली की Whatsapp वरील मिडिया गॅलरीत सेव्ह होणार नाही.

मीडिया विझिबिलिटी सेटिंग करण्याकरिता खालील स्टेप्स follow करा.

# संपूर्ण Whatsapp ची सेटिंग करण्यासाठी टिप्स.#

◆ सर्वप्रथम आपले Whatsapp ओपन करा.

◆ त्यानंतर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात तीन डॉट्स दिसतील त्यावर क्लिक करा.

◆ आता दिलेल्या पर्यायांपैकी Setting हा पर्याय निवडा.

◆ त्यानंतर चॅट ( Chat) या पर्यायावर क्लिक करा.

◆ आता मीडिया विझिबिलिटी ( Media Visibility ) हा पर्याय दिसेल, त्यासमोर असलेलं बटन ऑन असेल ते ऑफ (Off) करा.

◆ आता Whatsapp वर येणारे कोणतेही फोटो व व्हिडिओ तुमच्या फोन गॅलरीत सेव्ह होणार नाहीत.

# एका विशिष्ट कॉन्टॅक्ट / गृप ची सेटिंग करण्यासाठी टिप्स #

■ ज्या कॉन्टॅक्ट किंवा गृपची मीडिया विझिबिलिटी बंद करायची आहे ती चॅट ओपन करा.

■ आता त्या कॉन्टॅक्ट किंवा गृपच्या नावावर क्लिक करा.

■ खालीलपैकी Media Visibility हा पर्याय निवडा.

■ या चॅट मधील फोटो / व्हिडिओ गॅलरीत सेव्ह व्हावे असे वाटत असल्यास yes निवडा, अन्यथा No वर क्लिक करा.

संपूर्ण Whatsapp ची Media Visibility बंद असली तरी या सेटिंग द्वारे आपल्याला काही विशिष्ट कॉन्टॅक्ट किंवा गृपची मीडिया विझिबिलिटी सुरू ठेवता येते.

—- सतीश लाडस्कर,भंडारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here